तळेगाव । जिल्हा क्रीडा परिषद, इंद्रायणी इंग्लिश स्कूल व पै. सचिन शेळके कुस्ती संकुल तळेगाव यांच्यावतीने मावळ तालुक्यात प्रथमच तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन सरस्वती विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक सुरेश झेंड, इंद्रायणी इंग्लिश स्कूलचे संचालक अध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते व जिल्हा क्रीडा अधिकारी प्रवीण बोरसे, उद्योजक संतोष अण्णा शेळके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन इंद्रायणी स्कूलचे व्यवस्थापक विशाल मोरे, क्रीडा शिक्षक गोरख काकडे आदींनी केले.