कराटे स्पर्धेत पवारला रौप्यपदक

0

सांगवी । पिंपरी-चिंचवड येथील पीसीएमसीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये चौथी जेकेएनएसके इंडिया राष्ट्रीय कराटे चँपियनशिप 2017 स्पर्धा पार पडली. जपान कराटे-दो नोबुकावा-शितोरियो कई इंडिया यांच्यातर्फे स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेमध्ये सूर्यदत्त पब्लिक स्कूलच्या 12 वी कॉमर्स मधे शिकणार्‍या रोहित पवारने वैयक्तिक कथा व वैयक्तिक कुमिते या दोन प्रकारांमध्ये द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक पटकाविले. तसेच या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण विजेतपद पटकाविले आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम, बंगाल व केरळ अशा सात राज्यातील सुमारे पाचशे स्पर्धकांनी सहभाग नोेंंदविला होता.