कराटे स्पर्धेत विशाल बंगालेला कांस्य पदक

0

भडगाव : जळगाव जिल्हा कराटे असोसिएशनच्या खेळाडू विशाल किशोर बंगाले याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व महाराष्ट्र कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरी शालेय कराटे क्रीडा स्पर्धा 2016-17. या स्पर्धा नांदेड येथील जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड येथे राज्यस्तरी शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक मिळवून 17 वर्षाआतील 46 ते 50 किलो वजनगटात महाराष्ट्रतून त्याने तिसरा क्रमांक मिळवला आहे.

येथील लाडकुबाई विद्यालयाचा 10 वीच्या वर्गात शिक्षण घेत असून त्याने आपल्या तालुक्यासह जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर नावलौकीक केले आहे. विशाल बंगाले यांच्या या सुयशाचे कौतुक जळगाव जिल्हा कराटे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व पाचोरा नगरपालिका राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांनी सत्कार केला. व त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव संदिप मनोरे, जिल्हा कराटे असोसिएशनचे आकाश वाघ आदी. मान्यवरानी त्याचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या. शाळेचे क्रीडा शिक्षक डि.एस.पाटील यांचे व कराटे प्रशिक्षक विक्रम बंगाले यांचे त्याला कराटे स्पर्धेसाठी मोलाचे मार्गदर्शन केलाभले विशाल बंगाले हा भडगाव येथील प्रगतशील शेतकरी किशोर बंगाले यांचा मुलगा आहे. या पहिले पण कराटे स्पर्धेत त्याने आपली चमकदार कामगिरी केली आहे.