कराड-मलकापूर नगरपरिषद कॉंग्रेसच्या ताब्यात !

0

कराड-कराड-मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत काँग्रेसच्या नीलम येडगे या विजयी झाल्या आहेत. २७० मतांनी त्या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कसोटी लागून होती. भाजपच्या पराभवामुळे पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना धक्का बसला आहे.

या निवडणुकीत काँग्रेसचे १४ तर भारतीय जनता पार्टीचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेल्या भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा थोडक्यात पराभव झाला आणि काँग्रेसच्या नीलम येडगे नगराध्यक्षपदी निवडूण आल्या. एका प्रभागात समान मतं पडल्याने चिठ्ठी टाकून निकाल देण्यात आला, यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.