‘करिअरसाठी बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या संधी’

0

हडपसर । सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये बँकिंग, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास काळाची गरज बनली आहे. बँकिंग हे क्षेत्र विद्यार्थ्यांचे करिअर करण्यासाठी योग्य क्षेत्र आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये प्रचंड नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यासंधी ओळखून येणा-या आवाहनांना सामोरे गेले पाहिजे, असे नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ बँकिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंटचे प्रा. डॉ. व्ही. एस. कावेरी यांनी केले.रयत शिक्षण संस्थेचे एस.एम. जोशी कॉलेजमध्ये बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन झाले. एस. आर. मिचिगन, सी. एस. कुलथे, प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ, डॉ. वैशाली पाटील, डॉ. शकुंतला सावंत, प्रा. एम. आर. जरे, डॉ. बेबी खिलारे, डॉ. विश्वास पाटील, डॉ. कैलास रोडगे, प्रा. एफ. जे. कांबळे, डॉ. एन.एस. काळेल, प्रा. आय.एम. सय्यद आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सी.एस. कुलथे म्हणाले, बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीची मोठी संधी आहे. त्यामध्ये महिलांना सुरक्षिततेबरोबर चांगले वेतन देणारी नोकरी आहे. मिचिगन म्हणाले की, प्रत्येक गोष्टीची बेसिक नॉलेज समजून घेतले पाहिजे. छोट्या छोट्या संकल्पनाविषयी ज्ञान आत्मसात केले पाहिजे. शिस्त, कष्ट, दृढ आत्मविश्वास असला पाहिजे असे सांगून आपल्या क्षेत्रात लोकांना चांगली सेवा देता पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. नम्रता मेस्त्री यांनी केले. आभार डॉ. विश्वास देशमुख यांनी मानले.