चोपडा। महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित आर्ट, सायन्स व कॉमर्स महाविद्यालयातील बी-कॉमची विद्यार्थिनी करिष्मा अशोक चौधरी ही 2016च्या पदवी परीक्षेत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे. इन्कमटॅक्स व कॉपरेटीव्ह या विषयात त्याने सुवर्णपदक पटकविले होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व कै.एम.एन. अग्रवाल (सी.ए.) चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.
चोपडा येथील नवजीवन कृषी केंद्राचे संचालक अशोक चौधरी यांची मुलगी सुवर्णपदक देवून गौरविण्यात आले. करिष्मा ही चोपडा येथील नवजीवन कृषी केंद्राचे संचालक अशोक ताराचंद चौधरी यांची मुलगी आहे. पदवी प्रदान समारंभात कुलगुरु डॉ.पी.पी. यांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले होते. नुकतेच गोल्ड मेडल व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सुवर्णपदकाचे प्रायोजक कै. एम.एन.अग्रवाल (सी.ए.) चॅरिटेबल ट्रस्ट होते. त्याच्या या यशाबद्दलमहात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.सुरेश जी.पाटील, संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, नगराध्यक्षा मनिषा चौधरी,नगरसेवक जीवन चौधरी, चंद्रकांत पाटील, अशोक चौधरी, मनोज अग्रवाल, नरेंद्र पाटील, सुनील पाटील, भरत चौधरी, दत्तात्रय विसपुते, श्याम पाटील, राजेंद्र महाजन आदींनी कौतुक व अभिनंदन केले.