करीना-सैफ अली खान तैमूरवरच राहणार समाधानी!

0

मुंबई । करीना कपूर हिचे आयुष्य नेहमीच चर्चेत आलेले आहे. चित्रपटसृष्टीत अनेकांसोबत तिचे नाव चर्चेला येत असतांना तिने सैफ अली खानसोबत विवाह करण्याचा निर्णय अनेकांना धक्कादायक होता. त्या दांपत्याला जेव्हा मुलगा झाला, तेव्हा त्यांनी त्याचे नाव देखील तैमूर खान ठेवले. त्या नावानेही मोठा गदारोळ माजला, एका परकीय आक्रमणकर्त्याचे नाव दिल्याने त्याच्यावर टिकेची झोड उठली. आता या दाम्पत्यांनी एकाच मुलावर समाधानी राहण्याचा निर्णय घेतला आहे. तैमूरनंतर दुसर्‍या अपत्याचा विचार करत नसल्याचे करीनाने स्पष्ट केले आहे.

आपण खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या जागी ठेवत असतो. बाळंतपणाच्या वेळी अनेक महिला आराम करतात, मात्र मी त्याला अपवाद होते, मी शेवटपर्यंत काम करत होते, असे अभिनेत्री करीना कूपर-खान हिने तिच्या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले.

तैमूरसाठी सैफ अली खानने शूटिंग थांबवले
त्यावेळी ती तिच्या फिटनेसच्या विषयावरही बोलत होती. लवकरच तिच्या वीरे दी वेडिंग या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. त्या कालखंडात सैफ अली खान तैमूरला सांभाळणार आहे. त्या दरम्यान तो शुटींगच्या तारखा घेणार नाही. अशा प्रकारे करीना आणि सैफ हे दोघेही तैमूरचा आळीपाळीने सांभाळत करत असल्याचे तिने आवर्जून नमुद केले.

तैमूर दिसतो छान!
दरम्यान तैमूरच्या नंतर करीना आणि सैफ अली खान दुसर्‍या मुलाचा विचार करणार का?, असा प्रश्‍न करीनाला विचारण्यात आला, तेव्हा तिने असा कोणताच विचार नाही आणि तैमूर हा या बॉलिवूड स्टारचा एकमेव मुलगा असणार आहे, अशा शब्दांत तिने उत्तर दिले. दरम्यान सोशल मिडियातून मागील काही दिवसांमध्ये करीना तैमूर यांचे फोटो ट्रोल करण्यात येत होते. त्यावर बोलतांना ती म्हणाली की, आमच्या दोघांचे फोटे काढण्यात माझी कोणतीही हरकत नाही. तैमूर आहेच तितका छान, असेही ती म्हणाली.