मुंबई । न्यूझीलंड अ संघाविरुद्ध होणार्या दोन अनधिकृत चार दिवसीय कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय अ संघाच्या नेतेपदाची जबाबदारी फलंदाज करूण नायरकडे सोपवण्यात आली आहे. विजयवाडा येथे होणार्या सामन्यांसाठी राष्ट्रयि निवड समितीने रविवारी भारत अ संघाची घोषणा केली. भारत अ आणि न्यूझीलंड अ संघातील दोन चार दिवसीय सामने विजयवाडा येथे 23 ते 26 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोवर दरम्यान खेळवण्यात येतील
भारत अ संघ : करूण नायर (कर्णधार), प्रियांक पांचाळ, रविकुमार समर्थ, सुदीप चॅटर्जी, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, हनुमान बिहारी, रूषभ पंत, शाहबाका नदीम, के. गौतम, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि अंकित राजपूत.