नवी दिल्ली । भारतीय संघातील करूण नायर आणि मनीष पांडे यांच्यावर दक्शिण आफ्रिकेच्या दौर्यावर जाणार्या भारतीय अ संघाच्या अनुक्रमे अनधिकृत कसोटी मालिका आणि एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय अ संघ दक्शिण आफ्रिका अ आणि ऑस्ट्रेलियाच्या अ संघाचा समावेश असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. ही मालिका संपल्यावर यजमान संघाविरुद्ध भारतीय अ संघ चार दिवसीय दोन सामने खेळणार आहे. तिरंगी मालिकेतील भारत अ संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया अ संघाशी 26 जुलै रोजी होणार आहे. करूण नायर आणि जयंत यादवचा दोन्ही संघात समावेश करण्यात आला आहे. जायबंदी झालेला मनीष पांडे पुनरागमन करत असून त्याला फिटनेस टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. एकदिवसीय संघात आयपीएल आणि विजय हजारे करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्या कुणाल पंड्या, रिषभ पंत, बासिल थंपी, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौलची निवड करण्यात आली आहे. चार दिवसीय सामन्यासाठी रणजी करंडक स्पर्धेतील स्टार खेळाडु पियांक पांचाळ, शाहबाज नदीम, इशान किशन, संदी चॅटर्जी, अंकित बावणेला संधी देण्यात आली आहे.
एकदिवसीय सामन्यासाठी संघ
मनदीप सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, मनीष पांडे (कर्णधार), दीपक हुडा, करूण नायर, कुणाला पंड्या, रिषभ पंत, विजय शंकर, अक्शर पटेल, यजुवेंद्र चहल, जयंत यादव, बसिल थंपी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, सिद्धार्थ कौल.
चार दिवसीय सामन्यासाठी संघ
प्रियांक पांचाळ, अभिनव मुकुंद,श्रेयस अय्यर, अंकित बावणे, सुदीप चॅटर्जी, इशान किशन, हनुमा विहारी, जयंत यादव, शाहबाज नदीम, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, अनिकेत चौधरी, अंकित राजपुत.