कर्करोगापासून बचाव करण्यासाठी दैनंदिन दक्षता ठेऊन जीवनशैली सुधारली पाहिजे- डॉ.प्रशांत देशमुख

डॉ.प्रशांत देशमुख व आदर्श पोलिस पाटील सुजय देशमुख यांचा सत्कार

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मासिक विचारमंथन मेळाव्यात कर्करोगाविषयी मार्गदर्शन

 

अकोला-वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही व्याधींच्या बाबतीत आजार वाढणार नाहीत यासाठी औषध आहे परंतू त्यांचा संपूर्ण नायनाट करण्याचा इलाज नाही.म्हणून कर्करोग होऊ नये यासाठी आठवड्यातून एक दिवस उपवास,धुम्रपान वर्ज्य व कारखान्यातील प्रदुषण आणि रासायनिक द्रव्यापासून नाकावाटे जाणारे विषारी कण तथा वातावरणातील बदल यापासून स्वतःचे बचाव केले पाहिजेत,आहार आणि जीवनशैली सुधारली पाहिजे.असे मार्गदर्शन कर्करोग औषध संशोधक व मलकापूरच्या डॉ ‌राजेन्द्र गोडे औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य कर्करोगनिदानातील औषधोपचारातील अनेक सन्मानप्राप्त संशोधक डॉ.प्रशांत देशमुख,डोंगरगावकर यांनी केले.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या २५ व्या मासिक विचारमंथन तथा मार्गदर्शन मेळाव्यात ते प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम‌.देशमुख हे होते.यावेळी रिधोरा येथील आदर्श पोलिस पाटील सुजय देशमुख,केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

 

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने सुरू केलेल्या नियमित मासिक विचारमंथनाचा हा यशस्वी २५ वा मेळावा होता.यावेळी स़ंजय एम देशमुख यांनी डॉ ‌प्रशांत कृष्णराव देशमुख यांचे २०१४ पासून सुरू झालेले कर्करोगावरील संशोधन कार्य,त्यासाठी प्रयोगशाळा उभारणीसाठी त्यांना केन्द्रशासनाकडून मिळालेली आर्थिक मदत,त्यांच्या

Self disappearing

wound dressing & method of preparesion या सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता आणि त्यांना मिळालेला पेटेन्ट याबाबत माहिती देऊन त्यांच्या उदात्त मानवसेवी कार्याचा आणि पेटेन्टच्या प्राप्त यशाचा यावेळी गौरव करून त्यांना अभिनंदनासह शुभेच्छा व्यक्त केल्या.त्यांच्या संशोधनकार्याची अनेक विद्यापीठे संस्था,मराठी विज्ञान परिषद यांनी पुरस्कारांनी घेतलेली दखल आणि व्याख्यानांना राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय व्यापक प्रतिसादाची माहिती यावेळी त्यांनी दिली.आपत्ती निवारणकार्य तील दक्षता आणि मदत कार्याचा गौरव म्हणून दोनवेळा आदर्श पुरस्कार प्राप्त करणाऱ्या बाळापूर तालूक्यातील रिधोरा गावचे पोलिस पाटील श्री सुजय देशमुख यांच्याही कार्याचा गौरव त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी मानवतावादी सेवाकार्य करणाऱ्या डॉ.प्रशांत देशमुख आणि सुजय देशमुख यांचा शाल, सन्मानपत्र,पुस्तके व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.लोकस्वातंत्र्यचे सर्व उपक्रम हे कोणाच्याही मोठ्या मदतीशिवाय ,काही पदाधिकारी आणि सेवाभावींच्या समसमान अल्प आर्थिक मदतीतून राबविणारी ही एक स्वावलंबी आणि स्वाभिमानी पत्रकार संघटना असल्याची माहिती यावेळी संजय देशमुख यांनी दिली.महासंघाने हाती घेतलेल्या वाचन चळवळ अभियानाअंतर्गत सुप्रसिध्द साहित्यिक विठ्ठल वाघ यांच्या “मायबाप” या पुस्तकाचे कार्यक्रमातील सर्व उपस्थितांनाही यावेळी वितरण करण्यात आले.

 

डॉ.प्रशांत देशमुख यांच्या शालेय जीवनाची सुरूवात जेथून झाली त्या निंबा ग्रामस्थांच्या वतीने सरपंचपती पुरूषोत्तम सोनोने,ग्रा.पं सदस्य गणेश देशमुख,डॉ.अशोक तायडे,धम्मपाल तायडे,शिक्षक राजेश तायडे, नागेश सोळंके यांनी सुध्दा शाल आणि वृक्ष देऊन त्यांच्या मौलिक संशोधन कार्याचा यावेळी सन्मान केला.

 

याप्रसंगी नियमित शिरस्त्याप्रमाणे सर्वप्रथम लोकस्वातंत्र्यच्या सामाजिक वाटचालीचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून वंदन करण्यात आले.राजेन्द्र देशमुख व पुष्पराज गावंडे यांनीही दोन्ही सत्कारमुर्तींचा गौरव केला.तर दोन्ही सत्कारमुर्तींचा पत्रकार महासंघाच्या उपक्रमांचे कौतुक करून वाटचालीला शुभेच्छा दिल्या. ईलना राष्ट्रीय सचिव निवडीबद्दल मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष जे.टी‌.वाकोडे यांनी संजय देशमुख यांचा सत्कार केला.

 

सौ.जया भारती इंगोले यांच्या बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला केन्द्रीय मार्गदर्शक पदाधिकारी व शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाचे पदाधिकारी पुष्पराज, गावंडे, उपाध्यक्ष किशोर मानकर,अॕड.नितीन अग्रवाल,अॕड.राजेश जाधव,अंबादास तल्हार, ज्येष्ठ पत्रकार दिपक देशपांडे,सुरेश तिडके,विनोद जोशी,व्ही‌.एस‌.देशमुख,डॉ.शंकरराव सांगळे,संदिप देशमुख,सतिश देशमुख,अकोला उपाध्यक्ष विवेक मेतकर,सागर लोडम,विजय काटे,देशमुख जागृती मंडळ अध्यक्ष संजय कृ.देशमुख,के.व्ही.देशमुख,

अशोककुमार पंड्या,विजयराव बाहकर, अशोक सिरसाट,विनायकराव वाकडे,दिगंबर ताले,व ईतर सभासद व स्नेहीजण उपस्थित होते.आभारप्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले.

=============================

☝️ *वृत्त प्रकाशनार्थ*