भुसावळ : मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथे शेतकर्याने गळफास घेऊन आत्म्हत्या केली. गुरुवारी पहाटे सहा वाजेपूर्वी ही घटना घडली. अशोक लक्ष्मण पाटील (55) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात दिलीप दयाराम पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. तपास श्रावण जवरे करीत आहेत.