कर्जतमध्ये काँग्रेसची नोटाबंदीविरोधात रॅली

0

नेरळ । केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असून, या निर्णयामुळे देशाची आर्थिक स्थिती खालावली आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी अकरा वाजता कर्जत शहरातून रॅली काढण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी काळ्या फितर लावून निषेध नोंदवत कर्जत टिळक चौकातून रॅली काढत महावीर पेठ ते पुढे बाजारपेठेतून पुन्हा टिळक चौकातून रॅलीचा समारोप केला.

भाजप सरकारवर टीकास्त्र
याप्रसंगी तालुका अध्यक्ष अरविंद पाटील यांनी नोटबंदीचा निर्णय हा संघटित लूट आणि कायदेशीर दरोडा होता. असे सांगत भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. या रॅलीत तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, उपाध्यक्ष हेमंत देशमुख, महाराष्ट्र प्रदेशचे दीनानाथ देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अनुसया पादीर, शहराध्यक्ष पुंडलिक भोईर, कार्याध्यक्ष दिनेश रावळ, ज्येष्ठ नेते डॉ. विठ्ठल राव पाटील, विजय हरिश्‍चंद्रे, चंद्रकांत मांडे, सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, इस्माईल दिवाण, मुकेश सुर्वे, आवेश जुवारी, मनीष राणे आदी उपस्थित होते.