इंदापूर । क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या 127 व्या पुण्यतिथीनिमित्त ज्योतीराव फुले चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर व कर्जत तालुका माळी समाजातर्फे राज्यस्तरीय माळी समाज वधु वर व पालक परीचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा 1 डिसेंबरला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधील नगर रोडवरील भक्ति मंगल कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असल्याची माहिती दादासो सोनमाळी, अॅड. नवनाथ फोंडे, अँड. हरिश्चंद्र राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ज्योतीराव फुले चॅरीटेबल ट्रस्टचा हा 11 वा मेळावा आहे. सहा मेळाव्यांची माहिती देणारे पुस्तक 5 फेब्रुवारीला प्रकाशित होणार आहे. मेळाव्याला येताना वधु वरांनी बायोडाटा व दोन आय कार्डसाईज फोटो सोबत आणावेत, नाव नोंदणीसाठी 500 रुपये फी आकारण्यात आली आहे. मेळाव्यांची माहिती देणारे पुस्तक हवे असल्यास रजिस्टर पोस्टाने ते घरपोच पोहचविण्याची सुविधा आखण्यात आली आहे. त्यासाठी 100 रुपये जादा भरावे, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9623350525, 9404979204, 9421589500,9561190332 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन दादासो सोनमाळी यांनी केले आहे.