कर्जत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्ण जोशी विजयी !

0

कर्जत– कर्जत नगरपालिकेवर गेल्या २५ वर्षापासून असलेली आघाडीची सत्ता यावेळी शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणली आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्ण जोशी विजयी झाल्या आहेत. सुवर्णा जोशी यांचा २१०० मतांनी विजयी झाला आहे. नगरपरिषदेचे १८ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यात राष्ट्रवादीने ८, शिवसेनेने ४, भाजपाने ४ आणि आरपीआयने १ जागा जिंकली.

भिसेगाव, गुंडगे, दहिवली, मुद्रे, आकुर्ले या भागात मतदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे युतीला फायदा झाला. शहरी भाग असलेल्या बाजारपेठ परिसरात मतदारांचे प्रमाण कमी होते. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.