कर्जदार शेतकर्‍यांना योजना बंधनकारक

0

नंदुरबार । शासनाने खरीप हंगाम 2017 मध्ये राष्ट्रीय कृषि विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांनी केले आहे.नैसर्गिक आपत्ती,किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे.शेतकर्‍यांना नाविण्यपुर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसाणीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकर्‍यांचे आर्थिक र्स्थैर्य अबाधित राखणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सातत्य राखणे असे वैशिष्ट्य या योजनेत आहेत. कर्जदार शेतकर्‍यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळांसाठी योजना खुली आहे. शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम- 2 टक्के व रब्बी हंगाम- 1.5 टके व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

जोखमीची व्याप्ती वाढविण्यात आली
अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न म्हणजे मागील 7 वर्षाचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली 2 वर्षे वगळून) गुणीले त्या पिकांचा जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल,जोखमीच्या बाबी – योजनेतंर्गत जोखमीची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्यामध्ये पुढील बाबींचा सामावेश करण्यात आला आहे. पिक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान.