कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

0

धुळे । तालुक्यातील भदाणे येथे शुक्रवारी सकाळी एका शेतकर्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. कर्जबाजारी पणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. भदाणे येथील नाना काळू ठेलारी याने राहत्या घरातच गळफास लावून घेतला. शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या तरुणांनी त्याला फासावरुन उतरवून उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याने त्याचे पार्थिव जुने जिल्हा रुग्णालय येथील शवागारात हलविण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी नाना ठेलारी याच्या घरातील कुणीही सदस्य घरात नव्हते. त्यामुळे नानाने नेमकी आत्महत्या केव्हा केली हे सांगता येत नसले तरी कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.