कर्जबाजारीला कंटाळून तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

0

एरंडोल- सततची नापिकी, कृषिमालाचे घातलेले उत्पन्न यास कंटाळून ३० वर्षीय तरुण शेतकरी पुत्राने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पिंपळकोठा बुद्रुक ता.एरंडोल येथे घडली. याबाबत माहीती अशी, कि पिंपळकोठा खुर्द येथील शेतकरी पुत्र चेतन उमेशसिंग पाटील (वय-३०) याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मयत चेतन पाटील याची आई बाहेरगावाला गेलेली असल्यामुळे शेजारी राहणाऱ्‍या काकु त्यास जेवणासाठी बोलावण्यास गेल्या असता त्याना घराचा दरवाजा बंद आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. चेतन पाटील यांच्या वडिलांचे सुमारे चार वर्षापूर्वी निधन झाले आहे. मयत चेतन यांच्या आईच्या नावावर चार एकर शेती असुन त्यांचेवर सोसायटीचे व खासगी कर्ज होते. सततची नापिकी व कृषीमालाला मिळत असलेला कमी भाव यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत त्याने आत्महत्या केल्याची माहीती ग्रामस्थांनी दिली.चेतन याचे पश्चात आई, लहान भाऊ व विवाहित बहिण असा परीवार आहे. याबाबत कोमलसिंग प्रल्हाद पाटील यांनी दिलेल्या माहितीवारुंपोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन अशोक मोरे,प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.