लाहोर: पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून या संकटातून बाहेर काढण्यासाठी आयएमएफ हि संस्था पाकिस्तानला ६ अब्ज डॉलरचे कर्ज देणारआहे. हे कर्ज पाकिस्तानला तीन वर्षात टप्प्याटप्प्या मध्ये मिळणार असून या कर्जाला आयएमएफच्या संचालक मंडळाची मंजुरी मिळणे बाकी आहे.
पाकिस्तानची व्यापारी तुट हि २० दशलक्ष डॉलर पर्यंत पोहोचली असून गेल्या दोन वर्षात परकीय चलनाच्या साठ्यात निम्मी घट झाली असल्याची माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे आर्थिक सल्लागार डॉ. अब्दुल हफीज शेख यांनी दिली. दरम्यान पाकिस्तान सरकारने महागाई, कर्जाचा बोजा,आणि धीम्या गतीने वाढणारा विकास दर यांचा सामना करण्यासाठी आयएमएफ यांच्या कडे एकूण ८ अब्ज डॉलर ची मागणी केली होती.
या बेलआउट पॅकेज साठी पाकिस्तानला काही अटी पाळाव्या लागणार आहे. या अगोदरच्या कर्जाचे हप्ते फेडणे हि पाकिस्तानला अवघड झाले आहे.