कर्जबाजारी शेतकर्‍याची विष घेवून आत्महत्या

0

जळगाव । पाचोरा तालुक्यातील वरसाडा तांडा येथील 40 वर्षीय कर्जबाजारी शेतकर्‍याने स्वतःच्या शेतात कापूस उपटत असतांना शेतात असलेल्या फावारणीचे औषध घेतल्याने अत्यवस्थ वाटल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली असून घटनेबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, साईदास गणपत चव्हाण (वय-40) रा. वरसाडा तांडा ता.पाचोरा यांची घरातील परिस्थीत जेमतेम असून त्यांना एक मुलगी व चार मुले व पत्नी असा परीवार आहे. मागील वर्षी मुलीचे लग्न व यावर्षी पिकांचा उत्पन्न कमी आली. आपण कर्जबाजारी असल्याचे अनेकवेळा त्यांना गावात बोलून दाखविले होते. रविवार 8 एप्रिल 2018 रोजी दुपारी निमखेडी शिवारातील स्वतःच्या शेतात कापसाच्या झाडाची उपटनी करण्यासाठी शेतात गेले. दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास शेतात कपासीवरील फवारणीचे विषारी औषध घेतले. त्यानंतर त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांना जवळील पिंपळगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तब्बेत अत्यंत गंभीर झाल्याने त्यांना तात्काळ जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात 3.45 वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.