कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

0

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री येथील संतोष राजधर पाटील (वय ३६) या शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.

संतोष पाटील हे सकाळी शेतात गेले होते. त्यांनी विष प्राशन केल्याबाबत या शेत परिसरातील इतर शेतकर्‍यांनी वडिलांना मोबाइलद्वारे माहिती दिली. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संतोष पाटील यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. कर्जमाफीचाही त्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांचे वडील राजधर पाटील यांनी सांगितले.