कर्जबाजारी शेतकर्‍याने मृत्यूला कवटाळले

0

भुसावळ ः बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथील कर्जबाजारी शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याची घटना बुधवारी घडली.

सुपडू मच्छिंद्र परदेशी (58) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. बोदवड तालुक्यात शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची ही महिनाभरातील तब्बल तिसरी घटना आहे. एकीकडे शेतात काही पिकत नसताना वीज वितरण कंपनीने वीज बिल थकल्याने वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण असतानाच नापिकी तसेच कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, मयत सुपडू परदेशी यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले.