नंदुरबार : शहादा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या चहाच्या कॅन्टीनमध्ये एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहादा शहरातील महालक्ष्मी नगर मध्ये राहणारे अशोक चौधरी वय 35 या शेतकऱ्याच्या शेतजमीनीवर कर्जाचा बोजा आहे. शिवाय नापिकी असल्याने हे कर्ज कसे फेडावे या विवंचेत शेतकरी होता. या ताण तणावातून नैराश्य भावनेने तरुण शेतकऱ्याने स्वतःच तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या चहाच्या कॅन्टीनमध्ये गळफास घेवून जीवन यात्रा संपवली. ही घटना 26 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत शहादा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.