नागपूर । विदर्भाचे संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी रावते यांच्याकडे देण्यात आली आहे. कर्जमाफी शेतकर्यांपर्यंत पोहचू शकली नाही. कर्जमाफी झाल्यानंतर देखील विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत.
अगोदरचे कर्ज न भरल्याने नवे कर्ज मिळालेले नाही. अशा स्थितीत अस्मानी संकटामुळे गेलेल्या पिकाला आर्थिक मदत मिळावी, ही शिवसेनेची भूमिका आहे. शवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने त्याचा फटका विदर्भ, मराठवाड्याला बसला आहे. पीक नुकसानासाठी आर्थिक मोबदला जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.