कर्जमाफीची अंमलबजावणी करा

0

औरंगाबाद : महाराष्ट्राशेजारी असलेल्या तेलंगण या छोट्या राज्यानेही त्यांच्या राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. तसेच मोफत वीजही दिली. महाराष्ट्रात फक्त कर्जमाफीची घोषणा झाली. अंमलबजावणीच्या नावाने सगळी बोंब आहे अशी टीका धनंजय मुंडे यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केली.

मराठवाड्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीसाठी ते आले होते. मुंडे म्हणाले, लवकारत लवकर सरकारने सरकसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करावी. शेतकर्‍यांना दिलेली वाढीव वीज बिले मागे घेण्याचीही मागणी त्यांनी केली. कापसावरच्या बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानानंतर जाहीर करण्यात आलेली मदत फसवी आहे असा आरोप त्यांनी केला. बियाणे विकणार्‍या कंपन्या मदत करत नाही. त्यांनी थेट मोन्सेटो कंपनीकडे बोट दाखवले आहे. ही कंपनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल तेव्हा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना न्याय मिळेल का? असा खोचक प्रश्नही धनंयज मुंडे यांनी विचारला.