लोहारा। राज्य शासनाकडून राज्यातील शेतकर्यांना काही निकषावर सरसकट कर्ज माफीची घोषणा करण्यात आली असली तरी देखील बँकांना मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सुचना आलेल्या नाहीत, त्यामुळे ही घोषणा अद्यापपर्यंत केवळ घोषणाच ठरली आहे. शासनाने सरसकट कर्ज माफीची घोषणानंतर काही दिवसातच शेतकर्यांना तात्काळ बी बियाणी व पेरणीच्या कामासाठी तात्काळ दहा हजाराची मदत घोषीत केली होती. त्या बाबतचा शासन जीआर देखील काढण्यात आला आहे. मात्र आठवडा उलटत आला. तरी देखील लोहारा व परिसरातील एकाही शेतकर्याला दहा हजाराची मदत मिळालेली नाही व तसा कोणताही आदेश येथील बॅकांना अद्यापपर्यंत आलेला नाही.
शासनाची घोषणा ठरली निव्वळ फार्स
याबाबत येथील जिल्हा मध्यवर्ती ब्यान्केचे शाखा व्यवस्थापक दी जे पाटील यांचेशी व येथील सेंट्रल ब्यानकेचे व्येवस्थापक पोतदार यांचेशी आमचे प्रतिनिधीने संपर्क साधला असता अद्याप पर्यंत ब्यान्के च्या वरीष्ठ पातळी वरुण कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश अद्यपपर्यंत आलेले नसल्याचे संगीतले त्यामुळे आम्ही शेतक-यांना दहा हजाराची तात्काळ मदत देऊ शकत नहीं असेही वरील दोघही ब्यान्केच्या अधिकर्यांनी संगीतले. याबाबत तहसीलदार पाचोरा यांचे एक पत्र सेंट्रल बॅकेला आले असुन बँक अधिकारी मात्र वरीष्ठाच्या आदेशाची वाट पहात आहेत. येथील एक शेतकरी सुरेश गरबड चौधरी यांनी या दहा हजराच्या मदतीबाबत येथील सेंट्रल मध्ये जावून पैशाची मागणी केली असता तुमच्या खात्यावर अजून कर्ज असून तुमची कर्ज माफी झाली नसल्याचे सुरेश चौधरी यांनी संगीतले. एकंदरीत शासनाच्या घोषणेचा येथे निव्वळ फार्स ठरलेला आहे, असेच म्हणावे लागेल.