कर्जमाफीची प्रक्रिया सुरु; सरकारकडून बँकांना आदेश !

0

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान नव्या वर्षात बुधवारी 1 जानेवारीपर्यंत बँकांच्या मुख्यालयात 2 नोडल ऑफिसरची नेमणूक करावी असे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे. येत्या 1 जानेवारीपर्यंत बँकाच्या मुख्यालयात 2 नोडल ऑफिसरची नेमणूक करावी. यातील एक ऑफिसर हा कार्यकालीन कामकाज तर दुसरा अधिकारी आयटी समन्वयक म्हणून काम करेल. त्या अधिकाऱ्याचे नाव, फोन नंबर, ईमेल आयडी 1 जानेवारी 2020 पर्यंत सरकारकडे द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत.

त्याशिवाय ज्या खात्यांमधून कर्ज घेण्यात आले आहे त्यावर आधार कार्ड लिंक केलेल आणि आधार लिंक न केलेल्या खात्यांची माहिती ठाकरे सरकारने मागवली आहे. येत्या 7 जानेवारीपर्यंत ही माहिती पाठवावी असे सांगितले आहे. विशेष म्हणजे आधारशी न जोडलेल्या खात्यांची यादी शाखेत लावा. तसेच गावच्या चावडीवरही आधार न जोडलेल्यांची यादी लावावी असेही सांगितले आहेत. तसेच बँकांनी ग्राहकांना फोन करुन खाते आधारशी जोडून घ्यावे असेही यात नमूद केले आहे.