पुरंदर । शासनाने शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासाठी हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुरंदरच्या पूर्व भागातील नायगाव येथील श्री सिद्धेश्वर सहकारी विकास सोसायटीच्या वतीने ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या याजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकर्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असून लाभार्थी शेतकर्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरून देण्याचे आवाहन सोसायटीच्या वतीने शेतकर्यांना करण्यात आले आहे. यावेळी मारुती पाटोळे, प्रदीप खेसे, गिरीधर चौंडकर, अनिल शेंडगे, भानुदास चौंडकर, माणिक खेसे व महिला उपस्थित होत्या.