जळगाव । शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेत पात्र असलेल्या शेतकर्यांची आकडेवारी मोठी आहे. या आकडेवारीच्या तुलनेत ऑनलाईन अर्ज भरण्यात जळगाव जिल्हा महसूल विभाग आघाडीवर असल्याचे चित्र आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने या दिलेल्या मुदतीच्या कालावधीत सर्व शेतकर्यांचे अर्ज भरले जाण्याची शक्यता असल्याची माहिती उपनिंबधक अधिकारी विशाल जाधवर यांनी माहिती दिली.
26 शेतकर्यांना 10 हजारांची मदत
जळगाव जिल्ह्यातील राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र शेतकर्यांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. मात्र त्या तुलनेत 28 ऑगष्ट अखेरीस जिल्ह्यातून 2 लाख 85 हजार 024 शेतकर्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. आजच्या दिवसाला तब्बल 5 हजार 118 ऑनलाईन अर्ज भरण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील 2 लाख 47 हजार 207 शेतकर्यांची अर्ज अपलोड करून शासनाकडे कर्जमाफीचा अर्ज प्रत्यक्ष सादर करण्यात आले. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लागणारी भरमसाठ कागदपत्रे, महा ई-सेवा केंद्रे व आपले सरकार मधील तांत्रिक असुविधा शेतकर्यांना कागदपत्रे जमा करतांना लागणार कालावधी, करावा लागणारा प्रवास, मार्गदर्शनाची वाणवा, शासकीय यंत्रणांची अनास्था, लिंक मिळण्यात लागणारा दीर्घ कालावधी आदी विविध कारणांमुळे कर्जमाफी अर्ज भरण्याची गती मंदावली होती. 15 सप्टेंबर पर्यंत ऑनलाई अर्ज सादर करण्याची मुदत असून येत्या 20 दिवसावर आल्याने यंत्रणा व राजकीय पक्षांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शासनाने कर्जमाफीसाठीच्या अभ्यासासाठी मागणीत शेतकर्यांना 10 हजार रूपयांची तत्काळ घोषणा देण्यात आली होती. त्यानुसार गेल्या डीपीडीसीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी जिल्ह्यातील केवळ 2 शेतकर्यांना 10 हजार रूपयांचा तत्काळ कर्ज मिळाले होते. आजच्या आकड्यानुसार चाळीसगाव 2, अमळनेर 22 यावल 1 आणि जामनेर 1 असे एकुण 26 शेतकर्यांना दहा हजार रूपयांची मदत मिळाली आहे.