कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे शिवसेनेचे आवाहन

0

धुळे । कर्जमाफीचा अर्ज भरतांना अनेक अडचणी येत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपुर्ण कर्जमाफीचा आग्रह धरून राज्यभरात आंदोलन केले. ऑनलाईन अर्ज भरतांना शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत आहे. यात सर्वाधिक तांत्रिक अडचणी येत आहे. समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेने जिल्हाभरात आपले सरकार, महा ई-सेवा, सीएलसी सेवा या प्रशासनाने सुरु केलेल्या केंद्रावर जावून ऑनलाईन अर्ज करण्याकरीता मदतसेवा सुरु करण्याचे जाहीर केले आहे.

कार्यकर्त्यांशी संबंध साधून तात्काळ जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरावे असे आवाहन जिल्हा प्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, भगवान करनकाळ, महेश मिस्तरी, कैलास पाटील, भुपेश शहा, संजय गुजराथी, शानाभाऊ सोनवणे, हिम्मत महाजन, विशाल देसले, मनिष जोशी, विश्‍वनाथ पाटील, भरतसिंग राजपुत, दत्तु गुरव, नितीन पाटील, परशुराम देवरे, पंकज मराठे, चंद्रकांत गवळी, शानाभाऊ धनगर आदींनी केले आहे.