कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0

शिरपूर । शासनाने कर्जमाफीची घोषणा करून तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकर्‍याच्या पदरात काहीच न पडल्याने शिवसेनेने आंदोलनाची भुमिका घेत सोमवारी 11 रोजी दसर्‍यापुर्वी शेतकरी कर्जमुक्त करा, अशी घोषणा देत राज्यभरात मोर्चे काढले. धुळ्यातही मनोहर टॉकीज परिसरात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. आग्रारोड, मनपामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारातील घटकपक्षच रस्त्यावर उतरल्याने सरकारला ठोस निर्णय घेणे भाग पडणार आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी शिवसेनेने आधीपासूनच संघर्षाची भूमिका घेतली आहे.

या आधी बँकांपुढे ढोलबजाओ आंदोलनासह गेल्या तीन महिन्यात दोन टप्प्यात आंदोलन केले आहे. शासनाने कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर न केल्याने आता शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी शिवसेनेने तिसर्‍या टप्प्यातील आंदोलन सुरु केले आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत एकाही शेतकर्‍याला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. ऑनलाईन अर्ज भरण्यात शेतकर्‍यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहे. या सर्व त्रासापासून शेतकर्‍याची सुटका व्हावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शासनाचा धिक्कार करणार्‍या घोषणांचे फलक हाती घेण्यात आले होते. यावेळी शिवसैनिकांनी जयघोष केला. संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात महेश मिस्तरी, अतुल सोनवणे, भुपेंद्र लहामगे, संजय गुजराथी, प्रा.शरद पाटील, राजेंद्र पाटील, गंगाधर माळी, सुनिल बैसाणे, कविता क्षिरसागर, हेमलता हेमाडे, वंदना पाटील, भगवान करनकाळ, कैलास पाटील, भुपेश शहा, हिंमत महाजन, शानाभाऊ सोनवणे, विश्‍वनाथ पाटील, भरतसिंग राजपूत, मनिष जोशी, कल्याण बागल, दत्तु गुरव, छोटू पाटील, नितीन पाटील, पंकज मराठे, छोटू राजपूत, परशुराम देवरे, चंद्रकांत देवरे, मनोज पाटील, हिंमत साबळे, किरण पाटील, शानाभाऊ धनगर, नरेंद्र अहिरे, रंजना पाटील, सुनिता वाघ, रजनी कासार, विजया ठाकूर आदींसह हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.