जळगाव : गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी आवकाळी पाऊस,गारपीठ, दुष्काळाने होरपळत असताना आस्मानी व सुलतानी संकटानी राज्यभरात कहर केला होता. यामुळे शेतकर्याच्या आत्महत्येचे प्रमाण देखील त्याच पटीने वाढले होते. शेतकर्याला सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणा आणि राज्यभरात दाखल झालेल्या मान्सून पर्वामुळे शेतकर्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यभरात शेतकर्याचा उद्रेक पाहता महाराष्ट्रभर कर्ज माफीची मागणी विविध आंदोलनाच्या माध्यमातून लाऊन धरत शेतकरीच संपावर जाण्याची पाळी आली. त्याचे दुष्यपरिणाम देखील भोगण्याची वेळ राज्यावर आली. शेतकर्याने संतापाच्या लाटेत पिकवलेल्या मालाला हमी भाव मिळत नसल्या कारणाने भाजीपाला व दुध रस्त्यावर आणून टाकला. यामध्ये राजकीय पक्षाचा देखील सहभाग होता. अनेक ठिकाणी शेतकर्याचे आंदोलनाने तीव्ररूप धारण केल्याने शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी कायद्याचे भान राखत अनेक शेतकर्याना अटक करीत गुन्हे दाखल केले. इतिहासात शेतकरी संपावर कण्याची हि पहिलीच वेळ असल्याने इतर राज्यात देखील त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले. आपल्या चाणाक्ष स्वभावाची ओळख असणार्या मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्याशी संपर्कात राहून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वेळात यश आले नाही. मात्र पुन्हा शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकार्याना विश्वासात घेत मंत्रीगट समिती स्थापन करून अखेर शेतकर्यासाठी कर्जमाफीची घोषणा करीत पाठीशी उभे असल्याचे दाखवून दिले आहे.
सरकारचा कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय
शेतकर्यांच्या फार पूर्वी पासून समस्या होत्या. अनेक दिवसापासून मागण्या होत्या, अनेक वेळा जिल्ह्याभरात आंदोलने देखील झाले असून आमचे सरकार आल्यानंतर कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. गारपीठ,दुष्काळ,अवकाळी पावसाने शेतकर्याला घेरले होते. आम्ही विरोधी पक्षात असताना अनेक आंदोलने केली होती. आमच्या सरकारने घेतलेला निर्णयाचे स्वागत आहे. शेतकरी कर्जमाफीने तारला जाणार असल्याने भाजप सरकार शेतकर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अल्पभूधारकांना पूर्णपणे कर्जमाफी झालेली आहे. त्यामुळे पुन्हा शेतीसाठी कर्ज घेता येणार आहे. अजून कर्जमाफीचे काही निकर्ष येण्याचे बाकी असताना पुढील निर्णय आल्यावर बोलणे योग्य होईल. एक चांगला निर्णय घेतल्याचे समाधान आहे.
– आ.एकनाथराव खडसे, जेष्ठ नेते भाजप
शेतकर्याला कायस्वरुपी उभे करणार
2 जूनला अल्पभूधारक शेतकर्यान कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. शासन हे शेतकर्याच्या बाजूने असल्याने कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला. आताची कर्जमाफी तात्पुरता मलम-पटी असून शेतकर्याला कायम स्वरूपी उभे करण्याकरता प्रयत्न सरकारचे आहे. शेती करताना येत असलेल्या अडचणीवर मात करून उत्पन्न वाढविताना उद्योग प्रक्रिया वाढवण्याचा प्रयत्न शासनाचा असून त्यासाठी पावले उचलेली जात आहे. शाश्वत शेती कशी वाढविता येईल याकडे जास्त भर असणार आहे. नवीन पद्धतीने शेती व्यवसाय करण्याची गरज आहे. स्वतंत्र यंत्रणा शासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. कर्जमाफीचा मुद्दा जरी विरोधकांनी लावला मात्र मुख्यमंत्र्यानी याबाबत आगोदरच जाहीर करून ठाकले होते. शेतकर्याला सुगीचे दिवस आणण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे.
– ना.गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र
शासनाच्या वतीने कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला त्या बद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो. फक्त अल्पभूधारकांना कर्जमाफी देण्याचे सांगितले जात आहे. इतर शेतकर्याना देखील त्याचा फायदा मिळणे गरजेचे असून सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. सत्तेत राहून विरोध केला त्याला यश आले आहे.
– ना.गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री
महाराष्ट्र राज्याच्या शेतकर्याच्या पाठीशी भाजप सरकार ठामपणे उभे असल्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेतून स्पष्ट झाले आहे. शेतकर्याला मोठा दिलासा कर्जमाफीच्या माध्यमातून मिळणार आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आम्ही केली आहे.
– उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजप ग्रामीण
कर्जमाफी मिळाल्याने आनंद आहे. राज्यभरात शेतकरी संप पुकारण्यात आला होता. किसान क्रांती शेतकरी समितीच्या वतीने आंदोलने करण्यात आली. जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे सहकार्य या आंदोलनास मिळाले आहे. मिडीयाने शेतकरी संपाला चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी दिल्याने शेतकरी व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा विजय झाला आहे.
– एस बी पाटील, किसान क्रांती समन्वयक, जळगाव
सरकाने कर्जमाफी केली ही एक चांगली बाब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी अनेक संकटातून जात असतांना त्याला आधार देण्याची गरज आहे. कर्जमाफीमुळे शेतकरी उभा राहण्याची आशा आहे. अल्पभूधारकांना जरी कर्जमाफी झालेली असली तरी सरसकट कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे. यामुळे सर्व स्तरातील शेतकर्यांना न्याय मिळले.
– मा.आ.सुरेश जैन, ज्येष्ठ नेते शिवसेना
मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यासाठी पुढाकार घेत कर्जमाफीची घोषणा केली असताना आनंद होत आहे. सरकार शेतकर्याच्या पाठीशी उभे असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. अनेक आंदोलने शेतकर्यानी केली लोकशाहीच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला. त्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक पाठींबा दिला आहे.
– शिरीष चौधरी, आमदार, अमळनेर विधानसभा
कर्जमाफी केल्याचे आम्ही स्वागत करतो आहे. मंत्रीगट समिती स्थापन करून घेतलेला निर्णय आहे. शेतकर्याला योग्य तो न्याय मिळण्यासाठी आमचे नेहमी प्रयत्न राहिले आहे. राज्यात शेतकर्याची आवस्था वाईट होती. दिलासा दायक सरकारचा निर्णय आहे. शेतकरी संपाच्या काळात राज्यभरातील सरकार विरोधी आंदोलने झाल्याने त्याला यश आले आहे. -सतीश पाटील, आमदार, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी
मुख्यमंत्र्यानी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी सरसकट कर्ज माफी झालेली नाही. शेतकरी आज सुद्धा चिंतेत असून कर्जमाफीची घोषणा झाली मात्र अमलात आलेली नाही. नक्की कोणाला लाभ मिळतो यावर राज्यभर चर्चा आहे. राज्यसरकारच्या वतीने कर्जमाफीची पावले उचलली गेली त्याचे स्वागत करतो. जिल्ह्यात व राज्यात अनेक आंदोलने झाली. त्याचे यश म्हणता येईल.
-संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्ज माफीसाठी आंदोलन करण्यात आले. शेतकर्याना कर्ज माफी मिळावी म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर भाजीपाला, दुध टाकण्यात आले. सरकारने कर्ज माफी केली त्याचा आनंद आहे. सरसकट कर्ज माफी करण्याची गरज राज्यात आहे. आम्ही व शेतकर्यांनी केलेल्या आंदोलनालायश आले.
– गुलाबराव देवकर, माजी मंत्री कृषी व परिवहन