कर्जमाफीमुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा

0

जळगाव । गेल्या तीन-चार वर्षापासून सततचा दुष्काळ, नापिकीमुळे शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर वाढतच गेला. कर्जामुळे राज्यतील शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाली. शेतकर्‍यांची आत्महत्या रोखण्याचे एकमेव उपाय कर्जमाफी असल्याने राज्यातील शेतकर्‍यांनी 1 जून पासून इतिहासात पहिल्यांदा शेतकरी संप पुकारला. संपकाळात राज्यभर तिव्र आंदोलने झाली. शासनाने याची दखल घेत रविवारी 11 रोजी सुकाणु समितीशी चर्चा केल्यानंतर कर्जमाफी जाहीर केली. अल्पभुधारक शेतकर्‍यांना सरसकट तत्वत कर्जमाफी दिल्याने शेतकरी सुखावला असून त्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफी ही आनंदाची बाब असल्याने जिल्ह्याभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव येथे शेतकरी संघटना, किसान क्रांती मोर्चा, शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पाचोर्‍यात किसान क्रांतीच्या जल्लोष
पाचोरा । महाराष्ट्र शासन व शेतकर्‍यांच्या सुकाणु समितीच्या बैठकीत शेतकरी कर्ज माफीस तत्वत मान्यता देण्यात आली. शेतकर्‍याची मागणी मान्य करण्यात आल्याने पाचोर्‍यातील शिवाजी चौकात किसान क्रांती समितीतर्फे फटाके जल्लोष साजरा करण्यात आला. रविवारी 11 रोजी संध्याकाळी मुंबई येथे झालेल्या बैठकीत शासन व शेतकर्‍यांच्या वतीने सुकाणु समितीच्या माध्यमातून शेतकर्‍यांची मागणी मंजूर करण्यात आले. सचिन सोमवंशी यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचे सविस्तर माहिती दिली. यावेळी विकास पाटील, राजेंद्र भोसले, प्रवीण ब्राह्मणे, जिजाबराव वाघ, शेख शकिल शेख इब्राहिम, अनिल पाटील, शालिक शेलार, नंदु सोनार, गिरीश पाटील, राकेश सोनवणे, बाबुलाल राठोड, जिजाऊ पाटील, अनिल मराठे,प्रशांत दत्तु, प्रशांत पाटील, निलेश शेलार, परमेश्वर पाटील, प्रकाश राठोड, मुकेश तुपे, आदी उपस्थित होते.

चाळीसगावात भाजपातर्फे आनंदोत्सव
चाळीसगाव । कर्जमाफीला रविवारी तत्वत मंजुरी मिळाल्याने शेतकर्‍याला मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयाचे चाळीसगाव भारतीय जनता पार्टी तालुका व शहरच्या वतीने फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. आमदार उन्मेश पाटील यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार उन्मेश पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, शिक्षण सभापती पोपट भोळे, संजय पाटील, के.बी साळुंखे, राजेंद्र चौधरी, दिनेश बोरसे, विश्वास चव्हाण, अलकनंदा भवर, सुनील निकम, अमोल नानकर, चंद्रकांत पाखले, मंगेश चव्हाण, विकास चौधरी, भरत गोरे, कैलास गावडे, योगेश गव्हाणे, गिरीष बराटे, नरेंद्र जैन, मनोज पाटील, शिवदास महाजन, विजय जाधव आदी उपस्थितीत होते.

धरणगाव येथे शिवसेनेचा जल्लोष
धरणगाव। राज्यातील शेतकर्‍यांचा कर्ज माफी व्हावी अशी मागणी शिवसेनेने अधिक लावून धरली होती. कर्ज माफीची घोषणा झाल्याने शिवसेनेने धरणगाव येथे जल्लोष साजरा केला. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरुन कर्ज माफीची मागणी केली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष गुलबाराव वाघ, शहर प्रमुख रविंद्र जाधव, संजय चौधरी, विलास महाजन, धिरेंद्र पुरभे, बुट्या पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, सुनिल चौधरी, डॉ. विलास माळी, जितेंद्र धनगर, पप्पु कंखरे, मोहन महाजन, भाणुदास पाटील, गोपाल चौधरी, पप्पु चौधरी, राहुल रोकडे आदींनी फटाके फोळून जल्लोष साजरा केला. मोटार सायकल रॅली काढून घोषणा देण्यात आल्या.

कर्जमाफीचा लाभ घेणार
अमळनेर । सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता पाटील यांनी कर्जमाफीचा लाभ घेणार नसल्याचे पत्र प्रसिद्धिस दिले आहे. 50 हजारांचे मासिक पेन्शन मिळत असल्याने कर्ज माफीची आवश्यकता नाही. त्यामुळे कर्जमाफी लाभार्थ्याच्या यादीतून आपले नाव वगळण्यात यावे, अशी विनंती पाटील दाम्पत्याने केली आहे.