जळगाव । शासनाने शेतकर्यांना सरसकट, तत्वतः कर्जमाफी जाहीर केली आहे.कर्जमाफी जाहीर केल्यानंतर लाभ कोणाला द्यावयाचे किंवा कोणाला वगळावयाचे यावर चर्चा कर्जमाफ करतांना विचार करत नाही. शेतकर्यांना कर्जमाफी करतांना येवढी चर्चा का केली जाते असे मत राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रभारी अध्यक्ष प्रा.शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
शासनाने शेतकर्यांना तात्काळ दहा हजार रुपये कर्ज देण्याचे जाहीर केले आहे. मात्र जिल्हाबँकांकडे पैसे नसल्याने त्यांनी कर्ज वितरण करण्यास विरोध केला असल्याचे शेतकर्यांची फरफट होत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी जाहीर करतांना त्यात तत्वतः निकष हे शब्द टाकुन शासनाने कर्जमाफीच्या विषयावरुन शेतकर्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. बहुजन क्रांती मोर्चाने राष्ट्रीय किसान मोर्चाला पाठींबा जारी केला आहे. यावेळी बहुजनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, संजय सपकाळे, सचिन अडकमोल आदी उपस्थित होते.