लोहारा । दोन-तीन दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकर्यासाठी 34 हजार कोटीची कर्ज माफी जाहीर केली. मात्र ज्या प्रकारची कर्ज माफी जाहीर केली ती बहुतांश शेतकर्यांना मान्य नाही. कर्ज माफी बाबत शासनाने पुनर्विचार करुन निर्णय घ्यावा अन्यथा गर्जना संघटनेतर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष सोनवणे यांनी कर्जमाफीबाबत तीव्र नाराजी व्येक्त केली असुन आंदोलन इशारा दिला आहे. कर्ज माफित तात्काळ बदल करून कोणत्याही प्रकारची अट न घालता सरसकट सर्व सातबारा धारक कर्जदारानां कर्ज माफीचा लाभ द्यावा अशी मागणी पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी केली आहे. लवकरच जिल्हाअधिकारी कार्यालया समोर राजेंद्र चौधरी, अशोक सोनार, शंकर पाटील, भरत कोळी, सुभाष मोरे, संजय बविस्कर, दिलीप शिंदे, भागवत देशमुख या शेतकर्यासह लोहारा परिसरातील शेतकरी उपोषण करणार असल्याची माहिती राजेंद्र चौधरी यांनी दिली.