वाशिम । शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य विधी मंडळात सुरू असलेल्या गदारोळाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी अकोला -हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सातबारा कोरा करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. नेहमीची नापिकी व त्यातून आलेल्या कर्जबाजारीपणामुळे गेल्या वर्षभरात राज्यात 2 हजारापेक्षा जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून राज्यातील शेतकर्यांची या दुष्टचक्रातून सोडवणूक व्हावी. याकरिता शेतकर्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी अशी आग्रही मागणीकरीता वाशिम येथे शिवसेनेच्या वतीने अकोला – हैद्राबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काहीकाळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली.