माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबई:- राज्यात कर्जमाफीच्या ऑनलाईन प्रक्रियेवरून गोंधळ सुरू असताना आता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेची ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कर्जमाफीची ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर असून राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक वीज निर्मिती संच बंद असल्याच्या कारणाने 10 सप्टेंबरपासून 5 ते 9 तास लोडशेडिंग सुरू झाले आहे. आस्मानी सुलतानी संकटामुळे कापूस आणि पिके संकटात आहेत. शेतकरी या विवंचनेत अडकल्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.