जळगाव । शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर केली असून कर्जमाफी जाहीर होऊन महिना उलटला आहे. कर्जमाफी संबंधी शासन दररोज नव्या अटी लादत असून सामान्य शेतकर्यांसाठी ते डोकेदुखी ठरत आहे. कर्जमाफीचा योजनेतचा लाभ खर्या शेतकर्याला मिळाला पाहिजे, गैरप्रकार होऊ नये यासाठी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे शासनाने जाहीर केले आहे. सोमवार 24 पासून ऑनलाईन अर्जास सुरुवात करण्यात आली आहे. आपले सरकार केंद्र तसेच बँकामध्ये अर्ज भरणा केंद्र स्थापन करण्यात येत असून त्याद्वारे अर्ज भरण्यात येणार आहे. मात्र अर्ज भरतांना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण हो असून ऑनलाईन अर्ज कसे भरावे याबाबत अद्यात कोणतेही प्रशिक्षण दिलेले नसल्यामुळे शेतकर्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
डीडीआर यांनी घेतला आढावा
प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या आपले सरकार केंद्रावर कर्जमाफीचे अर्ज भरले जाणार आहे. डिजीटल ग्रामपंचायतीचे स्वप्न ठेवण्यात आले आहे मात्र अद्यापही ग्रामपंचायतींमध्ये केबल पोहोचले नसल्याने इंटरनेट उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे अर्जासंबंधी अडथळा निर्माण होणार आहे. काही गावांचे ऑनलाईन डाटा फिडींग झालेले नसल्याने गावे ऑनलाईन दिसत नसल्याने अडचण येत आहे. कर्जमाफीच्या योजनेसाठी शेतकर्यांनी अर्ज भरुन तो ऑनलाईन भरण्यासाठी एएसके, सीएससी व महाऑनलाईन सेवाकेंद्रावर द्यायचा आहे. मात्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाले असून शेतकरी शेतातील कामे सोडून या कामाकडे लागले होते मात्र याचाही काही उपयोग होत नाही.