कर्जमाफी झाली ! तरीही विकासोची व्याजासाठी तगादा

0

चाळीसगाव । राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून दिड लाखाचा आत कर्जाची रक्कम माफ होऊन त्याचा फायदा शेतकर्‍यांना झाला, असे मुख्यमंत्र्यांनी घोषीत केले असले तरी चाळीसगाव तालुक्यात 34 हजार 208 शेतकर्‍यांपैकी फक्त 8 हजार 720 शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून देखील विकासो सचिव कर्जाच्या 5 माहिन्याच्या व्याजाची रक्कम वसुलीसाठी तगादा लावत असल्याने कर्ज माफी झाली असतांना व्याजाची रक्कम का द्यावी असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील 34 हजार 208 शेतकरी या योजनेस पात्र आहे. त्यापैकी 8 हजार 720 शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्याला 48 कोटी 17 लाख 46 हजार 385 रूपये 8 हजार 720 शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले आहे. उर्वरित शेतकर्‍यांच्या खात्यावर अद्यापावेतो ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे 70 टक्क्यांच्यावर शेतकर्‍यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नसतांना विकासोचे सचिव ज्या शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. त्यांच्याकउे जुलैपासून डिसेंबर महिन्यापर्यंत व्याजाची रकमेसाठी तगादा लावत असल्याने शेतकरी मात्र संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. (सविस्तर माहिती अंकात)