कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची यादी जाहीर करा

0

नंदुरबार । अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची यादी जाहीर करायला सांगणार त्याशिवाय अधिवेशन पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी नंदुरबार येथे बोलतांना दिला.राष्ट्रवादी काँग्रेसचा नंदुरबारला आढावा घेण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करतांना पवार बोलत होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या चित्रा वाघ,माजी आमदार शरद गावित,उमेश पाटील, राजेंद्र गावित,, दिवंगत मंत्री, स्मिता पाटील, आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते.अजित पवार म्हणाले की राज्यातील भाजप सरकारने शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे.कर्जमाफ़ीची घोषणा केली. मात्र त्यात स्पष्टता नसल्याने शेतकरी द्विधा मनस्थिती सापडला आहे.अजूनही शेतकर्‍यांची यादी जाहीर न झाल्यामुळे संभ्रमावस्था आहे.

गद्दारांचा बदला घ्या..
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मार्गदर्शन केले. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींना न्याय देण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे.जिल्हा परिषद निवडणूकित काहींनी गददारी केली आहे,त्याचा बदला येणार्‍या निवडणूकित घ्यावा, असे आवाहन यांनी केले.उमेश पाटील, चित्रा ताई वाघ,शरद गावित, राजेन्द्र गावित, यांनीही मेळाव्यात मार्गदर्शन केले.

शिवसेनेचे मंत्री मांडीला मांडी लावून बसतात
एकीकडे ही अवस्था असल्याने दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री मांडीला मांडी लावून बसतात. शेतकर्‍यांचा इतका कळवळा असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे. कर्जमाफिसाठी बँकेसमोर ढोल वाजवत बसण्यापेक्षा सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर ढोल वाजविण्याची हिंमत दाखवावी,असेही आवाहन अजितदादा पवार यांनी केले. पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची यादी जाहीर करण्याची मागणी करणार आहोत.