कर्जमाफी झाल्याने नवस फेडण्यासाठी पायी पंढरपूर वारी

0

पाचोरा। तालुक्यातील वडगाव येथील शिवसैनिक हिंदूसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वरुप राजपूत यांने शेतकर्‍याला कर्जमाफी व्हावी यासाठी विठ्ठलाकडे साकडे घातले होते. शासनाने नुकतीच कर्जमाफी जारी केली असून स्वरुपची इच्छापूर्ती झाली आहे. इच्छापूर्तीचे नवस फेडण्यासाठी तो पायी पंढरपूर वारीला जात आहे.

4 जूलैला आषाढी एकादशी असून त्यानिमित्ताने तो पायी वारीला निघाला आहे. बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्या प्रेरणेने व आमदार किशोर पाटील याच्या मार्गदर्शनाने त्यांने पारी वारीची तयारी केली आहे. पंढरपूर येथून पुढे गाणगापूर (कर्नाटक) येथेही जाणार आहे. स्वरुप सोबत त्यांचे सहकारी मित्र देखील पायी वारीला सोबत राहणार आहे. स्वरुप फेडत असलेल्या आगळ्या वेगळ्या नवसामुळे परिसरात चर्चा होत आहे.