कर्जमाफी नव्हे, आत्महत्येस परवानगी द्या

0

नंदुरबार । दुष्काळ आणि नापिकीमुळे वडिलांनी काढलेलं कर्ज मी परतफेड करू शकत नाही. शेतकरी म्हणून जीवन जगण्यात मला रस राहिलेला नसून नैराश्य आलं आहे म्हणून मला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी नंदूरबार तालुक्यातील आसाणे येथील तरुण शेतकरी राजेंद्र शांतीलाल बुवा यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात बुवा यांनी म्हटले आहे की,माझे वडील शांतीलाल महारु बुवा यांनी सहा वर्षापूर्वी बँक ऑफ इंडिया या बँकेकडून कर्ज घेतले होते.

शासनाने कर्जमाफी दिली नाही
परंतु, वडिलांचे कालांतराने त्यांचा एका आजारपणात अकस्मात मृत्यू झाला. कर्जाचा डोंगर ते आमच्यावर सोडून गेले. निसर्गाचा कोप, चार वर्षापासून सततचा दुष्काळ व नापिकीमुळे बँकेचे कर्ज परतफेड करू शकलो नाही. शासनानेही कर्ज माफी केली नाही याच नैराश्य आलं असून शेतकरी म्हणून जीवन जगण्यात मला रस नाही. म्हणून एकतर कर्ज माफी द्यावी नाही तर मला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राजेंद्र शांतीलाल बुवा या तरुण शेतकर्‍याने जिल्हाप्रशासनकडे केली आहे.