चाळीसगाव। राज्यातील शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कर्जमाफीला आज सरकारने मंजुरी दिल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयाचे चाळीसगाव तालुक्यात आमदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार संपर्क कार्यालयाबाहेर फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आमदार उन्मेशदादा पाटील, शिक्षण व क्रीडा सभापती पोपट भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, गटनेते राजेंद्र चौधरी, सभापती दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, विश्वास चव्हाण, मार्केट संचालक अलकनंदा भवर, सरचिटणीस सुनील निकम, अमोल नानकर, चंद्रकांत पाखले, मंगेश चव्हाण, विकास चौधरी, भरत गोरे, कैलास गावडे, योगेश गव्हाणे, गिरीष बराटे, नरेंद्र जैन, मनोज पाटील आदींनी आंनदोत्सव साजरा करत घोषणाबाजी केली.