पाचोरा । राज्यशासनाने अल्पभुधारक शेतकर्यांना तात्काळ कर्जमाफी व महाभुधारक शेतकर्यांना तत्वतः कर्जमाफी ची घोषणा केली. मात्र कर्जमाफीच्या परिपत्रकात असलेल्या जाचक अटींमुळे शेतकरी संभ्रमात असुन या अटींमुळे शासनाने केवळ शेतकर्यांची दिशाभुल करुण जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. यामुळे या दळभद्री शासनाचा धिक्कार करण्यासाठी शिवसेनेचा वर्धापणदिनाचे औचित्य साधुन आमदार किशोर पाटील हे त्यांच्या मतदार संघातील प्रत्येक गावात जावुन परिपत्रकाची होळी करणार आहे. शेतकर्यांना परिपत्रकातील जाचक अटी वाचुन दाखविल्यानंतर त्याच ठिकाणी परिपत्रकाची होळी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकर्यांचा 7/12 उतारा कोरा करा
यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, अरुण पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, दिपकसिंग राजपुत, उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक सतिष चेडे, महेश सोमवंशी, वाल्मिक पाटील, बापु हटकर, धर्मेंद्र चौधरी, पप्पु राजपुत उपस्थित होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेच्या 80% समाजकारण व 20% राजकारण या उद्देशाप्रमाणे शिवसेनाही सदैव शेतकर्यांच्या पाठीशी असुन राज्यात 4 दिवस शिवसेना, शेतकर्यांच्या विविध संघटना व शेतकर्यांनी आंदोलनाने राज्य शासनास कर्जमाफीसाठी भाग पाडले. जिल्ह्यात 4 लाख 90 हजार शेतकरी कर्जदार सभासद असुन त्यापैकी 2 लाख 32 हजार शेतकरी 31 मार्च 2017 पर्यंत थकीत आहेत. याव्यतिरिक्त 30 जुन 2016 बागायतदार थकीत शेतकर्यांना कर्जमाफीची घोषणा केली असुन यानंतर 1 लाख 37 हजार शेतकर्यांची कर्ज थकीत आहे. जिल्ह्यात केवळ 50 हजार शेतकर्यांना कर्जमाफीचा फायदा मिळु शकतो. यामुळे जो पर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही व शेतकर्यांच्या 7/12 उतारा कोरा होत नाही तो पर्यंत शिवसेना सरकारला विरोध करीत राहील असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.