कर्जमाफीसाठी मुरबाड तहसीलदारांना निवेदन

0

मुरबाड : राज्यात सर्वत्र राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील जे-जे तालुके आहेत त्या-त्या तालुक्यातील नागरिकांनी विविध महामंडळांद्वारे कर्जे घेतली आहेत. ती कर्जे सुद्धा सरकारने माफ करावी यासाठी नुकताच मुरबाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या युवक आघाडी मुरबाड तालुका तर्फे मुरबाड तहसीलदार सचिन चौधर यांना लेखी निवेदन देण्यात आले. निवेदन देताना मुरबाड तालुका रिपाई अध्यक्ष दिनेश उघडे व रिपाई मुरबाड तालुका युवक अध्यक्ष मिलिंद अहिरे व सर्व रिपाई कार्यकारी पदाधीकारी उपस्थित होते.