कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने अलिबागमध्ये काढला मोर्चा

0

विविध मागण्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पेण । दसर्‍याच्या आगोदर महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करा या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, आमदार मनोहर भोईर, सल्लागार बबन पाटील, जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई, रवी मुंडे, सह संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, प्रशांत मिसाळ, पेण तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, दिपक रानवडे, मिलिंद देशमुख, निलेश घटवल, उप तालुका प्रमुख संतोष पाटील, उउपविभाग प्रमुख हिराजी चोगुले, जयराज तांडेल, सुरेश कोळी मुरूडच्या नगराध्यक्षा नेहा पाटील, महिला आघाडीच्या गिता म्हात्रे, वंदना पाशिलकर, दिपश्री पोटफोडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

कर्जमुक्ती करण्याची मागणी
न्यायालयापासून शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी दसर्‍यापुर्वी शेतकर्‍यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, बळीराजाला कर्जमुक्त करा अश्या घोषणा देण्यात आल्या. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांना कर्जमुक्तीसाठी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बोलताना जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई म्हणाले की भाजप सरकार शेतकर्‍याच्या कर्ज मुक्तीच्या केवळ पोकळ घोषणा करीत असुन आजही महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी आहे. त्याला कर्जमुक्त करा अशी आग्रहाची भुमिका शिवसेनेची असुन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शन खाली हा लढा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेना लढेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.