चोपडा। कर्जमुक्ती मिळावी, वीज बिल माफ व्हावे, स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे, आम्हला इच्छा मरणाची परवानगी साठी परवानगी मिळाली पाहिजे, या प्रमुख विविध मागणीसाठी शेतकरी कृती समितीतर्फे आज 26 एप्रिल रोजी शासकीय विश्राम गृह ते तहसील कार्यलयावर शेतकर्यांनी मोर्चा काढण्यात आला. शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, शेतकर्यांना खते, बियाणे वाजवी भावात मिळाली पाहिजे, वीज माफी मिळाली पाहिजे, शेतकर्यांना हक्काचा पीकविमा मिळाला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाली पाहिजे, शेतकर्यांच्या मुलांना शैक्षणिक फी माफ झाली पाहिजे. शेतकर्यांना इच्छा मरणाची परवनागी दिली पाहिजे, आदी मागण्यांचे निवेदन परिविक्षाधिन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले.
विविध घोषणांनी दणाणले शहर
मोर्चातील आयोजक संजीव सोनवणे हे वारंवार शेतकरी आले नाही म्हणून कडक शब्दात दुःख व्यक्त केले. तालुक्यातील शंभर गावांपैकी शेतकरी कृती समितीने मागील दहा बारा दिवसापासून एकूण 30 गावांना लहान मोठ्या सभा घेऊन आजच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन, एस.बी.पाटील, संजीव सोनवणे, डॉ.रवींद्र निकम यांनी केल्यावरही आजच्या मोर्च्यांत केवळ बागायती शंभर शेतकरी उपस्थित होते. आज काढण्यात आलेल्या शेतकर्यांनी चोपडा शहरात ’मरना रे मरना शेतकरी मरना, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्या शिवाय देणार नाही, या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय, कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, वीज बिल माफ झालेच पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे, आम्हाला इच्छा मरणाची परवानगी मिळालीच पाहिजे, अश्या विविध घोषणांनी चोपडा शहर दणाणून सोडले होते.
तहसीलवर शेतकर्यांची आक्रमक भूमिका
तहसीलवर कृती समितीचे अध्यक्ष एस.बी.पाटील यांनी चोपडा तहसील कार्यलयावर आपली भूमिका मांडतांना सांगितले की, शेतकर्यांच्या आत्महत्या का होतात हे मोदी सरकारला कळत नाही, सरकारने खताची सबसीडी कमी केली. कर्मचार्यांचे पगार वाढविले, त्याचे दुःख आम्हाला नसून शेतकर्यांना मारण्याचे षडयंत्र चालविले असून कलम 14 व 21 अनव्ये न्याय द्यावे. या देशातील शेतकर्यांनी जगण्याची हक्क गमाविला असून सुप्रीम कोर्टाने शेतकर्यांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे एस.बी.पाटील यांनी सांगितले.
मोर्चात यांची होती उपस्थिती
मोर्चात शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी एस.बी.पाटील, संजीव सोनवणे, डॉ.रविंद्र निकम, भागवत महाजन, संजीव बाविस्कर, किरणसिंग राजपूत, प्रफुल्लसिंग राजपूत, नितिन निकम, वसंत पाटील, भगवान पाटील, अजित पाटील, हिरालाल पाटील, माजी सभापती विनायक चव्हाण, बाजार समितीचे संचालक धनंजय पाटील, गिरीश पाटील, अनिल पाटील, अंबादास पाटील, मधुकर बाविस्कर, संदीप महाजन, जगदीश पाटील, डॉ.सुभाष देसाई, पंकज पाटील, ज्ञानेश्वर धनगर, नवनीत पाटील, विक्की सपकाळे, गोटू पाटील यांचेसह शेतकरी उपस्थित होते.