कर्जरोख्यांचे व्याज अधिकार्‍यांकडून वसूल करावे

0

पुणे । पुण्यातील चोवीस तास पाणी पुरवठाच्या महत्वाकांक्षी योजनेसाठी 200 कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांचे व्याज संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याकडून वसूल करावे, अशी मागणी सजग नागरिक मंचने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

या योजनेसाठी मागवलेल्या निविदा रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. कर्जरोखे काढणारी देशातील पहिली महापालिका असा बहुमान मिळवण्याच्या घाईत कर्जरोख्यांचा गाजावाजा करण्यात आला, अशी टीका मंचने केली आहे. नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होण्याला सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात कर्जरोख्यांचे दिवसाला 3 लाख रुपये व्याज भरावे लागणार आहे. ती रक्कम पुणेकरांच्या शातून जाण्यापेक्षा ती या सर्वाला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि पदाधिकार्‍यांकडून वसूल करावी, अशी मागणी मंचने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.