कर्जवाटप न केल्यास राजीनामा

0

अमळनेर । जिल्हा बँक ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बँक असून या बॅँकेवर शेतकरी अवलंबुन आहे. जिल्हा बँकेमार्फत शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. आता देखील शेतकर्‍यांदा नव्याने कर्ज वाटप केले जावे अन्यथा जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा देवू असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी केले. अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकर्‍यांना किसान आणि रुपी कार्डवाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षीय भाषणाप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी दिवसेंदिवस तंत्रज्ञानात नाविन्यपूर्ण क्रांती घडून येत असून तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी शेतीसाठी वापर करायला हवा. तरुण शेतकर्‍यांनी आता अपडेट राहण्याची गरज असल्याचे सांगितले.

पीक कर्जाचे व्यवहार कार्डाद्वारे
जिल्हा बँक संगणकीय होत असून शासनाच्या कॅशलेस धोरणानुसार एक हजार शेतकर्‍यांना किसन कार्ड वाटप केले जाणार आहे. यापुढे पीक कर्ज व्यवहार किसान तसेच रुपी कार्डाच्या माध्यमातूनच केले जाणार आहे. आयसीआयसीआय बँकेला हे कार्ड जोडण्यात आले असून व्यवहार मोफत होणार आहे. मात्र इतर एटीएम वर शुल्क लागेल. कर्ज वाटप समिती मार्फत 2000 कोटी कर्ज वाटप केले आहे. 1500 कोटी अजून वसूल झाले नाही बागायती कर्जबाबत निकषात अजून फेर बदल केले जातील.

हेक्टरी 42 हजारांचे कर्ज
में महिन्यात साधारण बागायतदार शेतकर्‍यांकडून उन्हाळी लागवडीला सुरुवात केली जाते. उन्हाळी लागवडीसाठी बागायतदार शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात कर्जाची आवश्यकता असते. त्यामुळे सर्व बागायती शेतक़र्‍यांना हेक्टरी 42 हजार कर्ज दिले जाईल. जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍यांनी कर्जासाठी प्रस्ताव दिलेल्या शेतकर्‍यांचे प्रस्ताव त्वरीत मंजुर करावे यासाठी सुचना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

कॅशलेशचे धोरण अडचणीचे
देशात चलनातील पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर कॅशलेस व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर जिल्हा बँकेने कार्ड धारक शेतकर्‍याना काउंटर वर पैसे मिळनार नाहीत असे म्हटले असले तरी त्यांना पैसे द्यायला लावू कारण अनेक शेतकरी अशिक्षीत आहे. त्यांना एटीएम कार्ड वापरता येत नाही शासनाचे कॅशलेस धोरण सहकार क्षेत्रात अडथळे आणणारे आहे. मात्र बदलत्या काळानुसार शेतकर्‍यांनी बदले गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
अमळनेर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांना किसान, रुपी कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालिका तिलोत्तमा पाटील, डी एल साळुंखे, रजनी शेषराव पाटील, विजय पाटील, दीपक बागुल, गिरीश पाटील, पी.डी. चौधरी, विलास सोनवणे, गोविंदराव विंचूरकर , जे पी पाटील, जे के पाटील, अनिल अहिरराव, दिनकर दिसले , अमोल पाटील, दीपक सूर्यवंशी, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक निबंधक गैरहजर होते.