कर्जाला कंटाळून बुलढाण्यात स्वत: सरण रचून महिला शेतकऱ्याची आत्महत्या

0

बुलढाणा-बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रा भनगोजी येथे शेतकरी महिलेने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेतात स्वत: सरण रचून महिलेने आत्महत्या केली आहे. आशा इंगळे असे या महिलेचे नाव असून त्या माजी सरपंचा देखील होत्या.

धोत्रा भनगोजी गावात राहणाऱ्या आशा इंगळे यांच्याकडे साडेतीन एकर जमीन आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्या आर्थिक विवंचनेत होत्या. आशा यांच्या पतीचे २००८ मध्ये निधन झाले असून एका मुलीचे लग्न झाले आहे. तर त्यांची दोन्ही मुले रोजंदारीवर काम करतात. आशा इंगळे यांच्यावर एकूण ८० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे समजते. दुष्काळामुळे यंदा आणखी परिस्थिती आणखी बिकट येणार, असे त्यांना वाटत होते.