कर्जासाठी डेबिटकार्ड सक्तीचे करु नये

0

शेंदुर्णी । पंतप्रधानांनी देशात नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशात कॅशलेस व्यवहाराला चालणा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. मे महिना सुरु असून लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. खरीब हंगामासाठी जिल्हा बँकेमार्फत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात येत असते. कर्ज घेण्यासाठी आता डेबीट कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. नोटाबंदीमुळे राष्ट्रीयकृत बँकेला मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा जाणवत असल्याने बहुतांश ए.टी.एम.मशिन बंद पडलेले असतात. त्यातच शेतकर्‍यांना डेबीट कार्ड सक्तीचे केल्यास पैशाची मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

कर्जदारांसाठी डेबीट कार्ड सक्तीचे करु नये अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. शेंदुर्णी परिसरातील शेतकर्‍यांनी शनिवारी 6 रोजी जिल्हा बँक व्यवस्थापकांना निवेदन दिले. कर्जाची रक्कम बँकेतुनच वितरीत करण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.